
बनावट कागदपत्रे जोडून दस्त नोंदवला, हवेली क्रमांक 7 मधील गैरप्रकार उघडकीस, मातंग बहुजन संघाचे संस्थापक अध्यक्ष मारुती अडागळे यांची माहिती
पुणे: कात्रज येथील सर्व्हे नं. 36 मधील रंजना पॅराडाईज या इमारतीच्या सदनिकेच्या पुनरविक्रीचा दस्त, चंदननगर येथील सहदुय्यम निबंधक, हवेली 7 यांच्या कार्यालयात नोंदवला गेला, या दस्तमध्ये या इमारतीच्या सदर सदनिकेच्या करारनाम्याची हवेली 9 मध्ये नोंद न करता, सूची क्रमांक 2, अर्थात इंडेक्स 2 हा बनावट तयार करून जोडण्यात आला आहे.
याबाबत मारुती अडगळे यांनी हवेली 9 कार्यलयात चौकशी अर्ज केला असता असा करारनामा दस्त नोंदवण्यात आला नसल्याचे पत्र देण्यात आले आहे.
त्याच रंजना पराडाईज या शासनाची कोणतीही परवानगी न घेता बांधकाम केलेल्या बेकायदेशीर इमारतीमधील अजून 2 फ्लॅट्सचे बोगस गुंठेवारी दस्त हवेली 9 मध्ये नोंदणी न करता, तेथील बनावट शिक्के, तारखा, सह्या मारून नोंदवल्याचे दाखवून ते बनावट व बोगस गुंठेवारी दस्त हवेली 7 मध्ये नोंदवल्याचे उघडकीस आले आहे. याचा अर्थ हवेली 9 मधील शासकीय शिक्के हे बेकायदेशीर कामासाठी बाहेर वापरून बनावट दस्तऐवज तयार करण्याचे मोठे रॅकेट सुरू आहे.
अखेर हे बनावट दस्त चंदन नगर येथील हवेली 7 मध्ये वापरून विक्री करारनामा नोंदवण्यात आल्याचे मारुती अडगळे यांनी स्पष्ट केले.
या बेकायदेशीर कामात हवेली 9, हवेली 7 मधील सहदुय्यम निबंधक अधिकारी, क्लार्क, शिपाई यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
त्यामुळे हवेली तालुक्यातील नोंदणी विभागाचे अशी नियमबाह्य उचापती सतत बाहेर येत असून, एकूण सर्वच कार्यालयात गैरकारभार सुरू असल्याचे उघडकीस येत आहे.
यापार्श्वभूमीवर, हवेली 7 मधील सर्वच नोंदणी व्यवहारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मारुती अडागळे यांनी केली असल्याचे महामीडिया वॉच न्यूजशी बोलताना सांगितले आहे.
