पुणे: हवेलीतील नांदोशी गावच्या गट नंबर 4 मधील खाणी त्वरित बंद करण्यात याव्यात, असा आदेश 2017 साली तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल प्रशासनाला दिले होते. मात्र फक्त काही दिवस खाणी बंद ठेवून पुन्हा सुरू करण्यात असल्या. विद्यमान जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी एकH वादग्रस्त जमिनीमध्ये तात्पुरते परवाने दिलेच, तसेच यापूर्वीही सुरू असणारे बेकायदेशीर खानपट्टे सुरूच ठेवले आहेत.
नांदोशी येथील या खाणीमध्ये अहोरात्र बेसुमार उतख्तनं होत असते, जे की विशिष्ट वेळेत थांबवायला हवे, तसेच हा भाग सरकारी वनीकरण विभागात मोडत असल्याने या क्षेत्रात उत्खनन बेकायदेशीर ठरते, तरी या खाणी गेली 14 वर्षे अव्याहतपणे सुरूच आहेत.
तसेच नियमानुसार केवळ 6 मीटर जमिनीत खोदकाम करण्याची परवानगी असताना, चक्क 50 मीटर जमिनीत खोल जाऊन खोदाई सुरू आहे, तसेच विनापरवाना खडी क्रशर प्लांट टाकण्यात आले असून त्यामुळे परिसरात प्रचंड धूळ, व ध्वनिप्रदूषण होत आहे.
विनापरवाना सुरुंग लावून टेकड्या डोंगर फोडले जात आहेत, विनापरवाना खडी, मुरूम, दगडमाती या गौण खनिजांचे अवैध वाहतूक केली जात आहे.
यासंदर्भात नांदोशी, किरकटवादी, धायरी परिसरातील अनेक नागरिकांनी जिल्हाधिकारी, प्रांत, हवेली तहसीलदार यांना पुराव्यानिशी तक्रारी केल्या आहेत, त्यानुसार तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी प्रत्यक्ष खाणीमध्ये जाऊन तपासणी करून गैरवापर आढळून आल्यास तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात देने गरजेचे असताना, खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, प्रांत, तहसीलदार, मंडलं अधिकारी डोळे झाकून ही निसर्गाची लयलूट होताना मूग गिळून गप्प आहेत.
मुळातच जिल्हाधिकाऱ्यांनी या खाणी बंद केल्या तरीही सर्वकाही बिनबोभाट सुरू आहे, हीच तर पुणे महसूल विभागाची खासियत आहे.
