विशेष
नोंदणी उपमहानिरीक्षक माईनकर यांच्यावरील 800 कोटींच्या शासकीय फसवणूक आरोपाबाबत तपासणी करून कारवाई करणार — नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे
महामीडियावॉचतर्फे IG रविंद्र बिनवडे व नोंदणी खात्याचे मुख्य सचिव सत्यनारायण बजाज यांच्याकडे तक्रार
पुणे : नोंदणी उपमहानिरीक्षक धर्मदेव माईनकर यांनी केलेल्या दस्तनोंदणी मधील सुमारे 800 कोटींच्या शासकीय फसवणूक बाबत लवकरच तपासणी करून कारवाई करू, असे आश्वासन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी महामीडिया वॉच न्यूजशी बोलताना दिले.
तसेच नोंदणी खात्याचे मुख्य सचिव सत्यनारायण बजाज यांच्याशी संपर्क साधून या शासकीय फसवणुकी बाबत तक्रार केली असून लवकरच त्यांची भेट घेऊन माईनकर यांच्यावर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
