सामाजिक

ज्येष्ठ पत्रकार व विधिज्ञ रफिक मुल्ला यांना ‘शिवछत्रपती सामाजिक कार्य पुरस्कार’

शिवशंभू प्रतिष्ठानचे वार्षिक पुरस्कार जाहीर; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव.

पुणे, दि. ५ जेष्ठ पत्रकार रफिक मुल्लाजानेवारी २०२६ (प्रतिनिधी):
महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या *शिवशंभू प्रतिष्ठानच्या* वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या विविध क्षेत्रांतील मानाच्या पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. *यंदाचा ‘शिवछत्रपती सामाजिक कार्य पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार तथा विधिज्ञ रफिक मुल्ला यांना जाहीर करण्यात आला आहे.* पत्रकारिता व सामाजिक कार्याच्या माध्यमातून सामान्यांच्या न्यायहक्कासाठी त्यांनी उभारलेल्या लढ्यात दिलेल्या उल्लेखनीय कायदेशीर योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. ह.भ.प. श्री भारत जाधव महाराज यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

याशिवाय, शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रांतील मान्यवरांसाठी अन्य पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली आहे. व्याख्यात्या व सामाजिक कार्यकर्त्या आश्विनी सातव आणि मुक्ता कदम यांना ‘तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. संस्थात्मक कार्याच्या माध्यमातून समाजप्रबोधनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुण्यातील ‘इंडी जर्नल’ या न्यूज पोर्टलला ‘शिवछत्रपती स्वराज्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.

कीर्तनाच्या माध्यमातून समाजजागृतीचे कार्य करणारे ह.भ.प. मधुकर महाराज बारुळकर यांना ‘जगद्गुरू तुकोबाराय लोकजागृती पुरस्कार’, तर औद्योगिक क्षेत्रातील आश्वासक व उल्लेखनीय कामगिरीबद्दल युवा उद्योजक पंकज सावंत यांना ‘छत्रपती प्रतापसिंह महाराज युवा उद्योगरत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

या सर्व मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा विठोबा माऊलीच्या पवित्र नगरी पंढरपूर येथे संपन्न होणार असल्याची माहिती शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने जगद्गुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. सुजित शिंदे यांनी दिली.

SHARE

Chief Editor Hemant Mali

चालू घडामोडी, शोध बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.