अवैध जनता वसाहत टीडीआर घोटाळ्यातील कन्सल्टन्सीकडून दोन कोटींच्या बिलासाठी अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दबाव!
काळ्या यादीत टाकण्याची मोदी विचार मंचाची मागणी
पुणे: प्रतिनिधी–
जनता वसाहत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या 763 कोटी च्या लँड टी डीआर घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
गृहनिर्माण विभागाचे अप्पर सचिव हे या घोटाळ्याची
चौकशी करीत आहेत परिणामी या प्रकरणात एस आरए चे अधिकारी आणि बिल्डर हे अडचणीत आले असतानाच पुनर्वसन योजनेतील कन्सल्टन्सी संदीप महाजन यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी नरेंद्र मोदी विचार मंच कडून मुख्य सचिवालयाकडे पत्राद्वारे केली आहे
‘ओंकार क्रिएशन्स ‘यांचे प्रोप्रा संदीप महाजन यांनी चुकीचा सल्ला देऊन एसआरए च्या अधिकाऱ्याची
दिशाभूल केल्याचा आरोप मोदी विचार मंच कडून
केला आहे याच कन्सल्टन्सी ची दोन कोटी रूपयांची फि होती ती देण्यात यावी अशा मागणी चे पत्र
ओंकार क्रिएशन्सने एसआरए विभागाकडे केली
आहे यासाठी संबधित अधिकार्यां वर बिल काढण्यासाठी दबाव टाकला जात आहे कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली जात आहे
चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करून सर्वसामान्य झोपडपट्टी धारकांचा पैसा गिळकृत करण्याचा प्रयत्न कन्सल्टन्सी कडून झाला असताना त्यांच्यावर ही कारवाई होणे गरजेचे आहे त्यांची सखोल चौकशी कोण करणार ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याबाबत एसआरए मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश
खडके यांच्याशी संपर्क केला असता ओंकार क्रिएशन्स कडून दोन कोटी बिला ची मागणी करण्याबाबतची
फाइल माझ्याकडे आलेले नाही मात्र त्याची माहीती कार्यालयातून घेतो असे खडके यानी सांगितले.