प्रशासकीय
सिंहगड कॉलेजचा थकलेला 55 कोटी मालमत्ता कर वसूल करण्यात महापालिका अधिकारी अपयशी! 3 चेक बाऊन्स होऊनदेखील अर्थपूर्ण मौन!!!
वडगाव कॅम्पस मधील 50 गाळे सील केले, मात्र लिलाव नोटिसा देऊन अधिकारी शांत!!
पुणे : पुणे महापालिका अंदाजपत्रक 10 हजार कोटीपर्यंत पोचले असून मालमत्ता करातून मिळणारे उत्पन्न हे महत्वाचे असताना, सिंहगड कॉलेजचे थकीत 55 कोटी वसूल करण्यासाठी महापालिका मालमत्ता कर उपायुक्त उत्सुक दिसत नाहीत.
यापूर्वी सिंहगड कॉलेजचे प्रत्येकी पन्नास लाखांचे 3 चेक बाऊन्स झाले असूनदेखील महापालिका अधिकाऱ्यांनी कारवाई करणे टाळले आहे. यावर्षभरात या विभागातील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची 4 वेळा बदली झाली, त्यामुळे या विभागातील भ्रष्टाचार बाहेर येऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.
सिंहगड कॉलेज प्रमाणेच अनेक मोठ्या आस्थापनाचे शेकडो कोटी कर थकीत असताना पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डोळेझाक करणे संशयास्पद आहे.
याबाबत विचारणा केली असता, सिंहगड कॉलेज न्यायालयात गेल्याने कारवाई करू शकत नसल्याची कारणे अधिकारी देत आहेत.