रिंगरोडसाठी बेकायदेशीर डोंगरफोड, बेसुमार वृक्षतोड!! राज्य स्ते विकास महामंडळच्या रिंग रोड कामात हवेलीत सांगरून परिसरात ठेकेदाराकडून मनमानी कारभार!
MSRDC च्या रिंगरोड कामावर शासनाचे दुर्लक्ष, जिल्हाप्रशासन, तहसीलदार, गौण खनिज, वनविभाग मूग गिळून गप्प!!
पुणे : हवेलीत पुण्यभोवताली दोन रिंगरोडची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यापैकी MSRDC च्या कामात ठेकेदाराला कंत्राट देऊन झाल्यावर, तो नियमाधीन राहून काम करतो की नाही हे पाहणे शासनाचे काम आहे.
मात्र सांगरून तालुका हवेली मधील परिसरात रिंगरोड ठेकेदार मनमित सिंग याच्या कंपनी तर्फे प्रचंड मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन व बेसुमार वृक्षतोड सुरू असून त्यावर जिल्हा प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे नियंत्रण उरलेले नाही.
याबाबत जिल्हाप्रशासन, हवेली तहसीलदार, MSRDC, वनविभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ डोळ्यावर कातडे ओढून बसलेत. सांगरून परिसरात अक्षरशः शेकडो डंपर मुरूम माती उत्खनन रोज होत असून तेथील लाखो झाडे, वृक्षांची सरेआम कत्तल होत आहे.
आणि हे सर्व विकासाच्या नावाखाली सुरू असल्याने कोणीही माहिती देत नाही, शासनाचे काम असल्याने कोणत्याही परवानगीची गरज नाही, असे उत्तर शासकीय अधिकारी कडून मिळत आहे.