प्रशासकीय

नोंदणी व मुद्रांक खात्यातील हवेली 12 व 20 मध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघडकीस, वरिष्ठांना अनेक तक्रारी होऊनही कारवाई नाहीच!

हवेलीमधील जवळपास सर्व कार्यालयात जेवढा महसूल शासनाला जमा होतो त्याच्या दुप्पट अधिकाऱ्यांच्या खिशात!!

पुणे: महसूल खात्यातील नोंदणी व मुद्रांक खात्यातील हवेली क्रमांक 12 व 20 मध्ये, सन 2024 ते आजपर्यंत नोंद केलेली सुमारे 2000 दस्तनोंदणी प्रकरणे महामीडिया वॉच न्यूज टीमने तपासली असता, त्यामध्ये महसूल नोंदणी अधिनियम कायद्यातील अनेक नियमांचे उल्लंघन करून शासनाचा सुमारे 100 कोटीपर्यंत महसूल बुडवल्याचे समोर आले आहे. 

यासंदर्भात मुद्रांक जिल्हाधिकारी, जिल्हा सहनिबंधक अधिकारी यांचेकडे रितसर दस्त क्रमांक पुरावे व तक्रार अर्ज दिल्यानंतरही कारवाई केली जात नाही. हवेलीमधील जमिनी व मालमत्तांचे दर गगनाला भिडल्याने सर्वाधिक महसूल हवेली तालुक्यातून मिळाला पाहिजे.

प्रभारी दुय्यम निबंधक श्री रवि कोळी यांनी 2024 व 25 मध्ये हवेली 12 येथे कार्यरत असताना हजारो दस्तनोंदणी मध्ये तुकडेजोड व तुकडेबंदी कायदा उल्लंघन, कमी क्षेत्र दाखवून कमी मुद्रांकशुल्क जमा करणे, बनावट दस्तऐवज स्वीकारून नोंदणी करणे, स्कीप तरतुदीचा गैरवापर करणे, तोतया व्यक्तींना उभे केलेल्या प्रकरणांची नोंद करणे, नोंदणी विभागाच्या रेडिरेकनर नुसार शुल्क न आकारता, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कमी शुल्क आकारून दस्तनोंदणी करणे, अशाव इतर अनेक प्रकारे नियम उल्लंघन करून कोळी यांनी हवेली 12 व हवेली 20 कार्यालयात कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे.

तसेच हवेली 20 मधील मार्च 2026 पासूनचे दस्तनोंदणी मध्ये विविध कारणांनी नोंदणी रोखून धरलेले दस्त( एडिएम दस्त ) कोळी यांनी बेकायदेशीर रित्या स्वाधिकारात नोंद केले, तसेच वरील उल्लेख केलेल्या तुकडबंदी, बनावट दस्तऐवज, कमी मुद्रांकशुल्क नोंदणी शुल्क आकारून कोट्यवधी रुपयांचा शासकीय महसूल बुडवल्याचे समोर आले आहे.

यासंदर्भात प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी महामीडिया वॉच न्यूजला, कोळी यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

SHARE

Chief Editor Hemant Mali

चालू घडामोडी, शोध बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.