क्राईम

सहकारनगरमध्ये ‘बिहार’, सर्वप्रकारच्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट, पोलिसांचे अर्थपूर्ण मौन!

एमडी ड्रग्स, गांजा, मटका, जुगार, वेश्याव्यवसाय, पालिकेच्या इमारतीत अवैध लॉज सर्रास सुरू!

पुणे: शहरातील उच्चभ्रू, शांत समजला जाणाऱ्या सहकारनगर भागात एमडी ड्रग्स, गांजा विक्री, मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, जुगार, मटका तसेच महापालिकेच्या एसआरए इमारतीवर अवैध ताबा मिळवून त्यात अवैध लॉज, अमली पदार्थ, वेश्याव्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू आहे.

याबाबत सहकारनगर पोलिसांना तक्रार केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली असून कारवाई करत आहोत असे मोघम उत्तर मिळाले. धनकवडी मध्ये भारती हॉस्पिटल शेजारी गल्ली मध्ये मास्टरपीस नामक जिममध्ये एमडी ड्रग्सचे सर्वात मोठे रॅकेट चालवले जाते, एक हजार रुपयांना 1 ड्रग्स पुडी विकली जाते, दिवसरात्र तिथे पुणे शहरातून शेकडो तरुण तरुणी एमडी ड्रग्स विकत घ्यायला येतात, तसेच याठिकाणहुन पुणे व पश्चिम महाराष्ट्रात एमडी ड्रग्स पुरवले जातात.

यापूर्वी या जिमवर कारवाई झाली होती, मात्र त्याचदिवशी सायंकाळी जिम मालक अटक न होता जिममध्ये पुन्हा ड्रग्स विकत होता, आणि न्यूज चॅनेल्सवर त्याच्यावर कारवाई झाल्याची बातमी पहात हसत होता. ही माहिती एकेकाळी त्या ड्रग्सचा आहारी गेलेल्या मात्र आता ड्रग्स सोडलेल्या युवकाने महामीडिया वॉचन्यूजला दिली. आसपासच्या व इतर भागातील तरुणी ड्रग्सच्या इतक्या आहारी गेल्यात की एका एमडी पुडीसाठी, शरीर विक्रय करत आहेत. पोलिस मात्र कानाडोळा करताहेत, हे अनाकलनीय आहे.

याव्यतिरिक्त शंकर महाराज चौकात उड्डाणपुलाखाली अहिल्यादेवी शॉपवर हॅप्पी मसाज सेंटरयेथे सर्रास वेश्याव्यवसाय सुरू आहे. विवेकानंद पुतळ्याजवळ रांका ज्वेलर्स शेजारील गल्लीमध्ये दिवसाढवळ्या गांजा, मटका, जुगार सुरू असतो. कोणी तक्रार केल्यास नाममात्र किरकोळ कारवाई दाखवली जाते, मात्र दुसऱ्यादिवशी सर्व सुरळीतपणे सुरू होते, ही जादूच म्हणावी लागेल.

शंकर महाराज उड्डाणपुलाखाली ज्ञानेश्वर सहकारी गृहरचना संस्थेच्या गेटशेजारी महापालिकेची 3 मजली एसआरए बिल्डिंगचा ताबा स्थानिक गुंडांनी घेतला असून कोणीही तिथे राहायला येऊ शकते, त्याचे भाडे हे गुंड घेतात, इथे सर्रास अमली पदार्थ विकले जातात, वेश्याव्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू असतो. लाईट बिल , पाणी बिल भरणे तर दूरची गोष्ट.

कमालीची गोष्ट म्हणजे, याबाबत पोलिसांनी कारवाई न करता महापालिकेला पत्र पाठवून माहिती दिली असल्याचे सहकारनगर पोलिसांनी सांगितले.

 

 

SHARE

Chief Editor Hemant Mali

चालू घडामोडी, शोध बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.