ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे विमानतळाची सुरक्षा रामभरोसे, एरोमॉलमधून विमानतळ प्रवेश खाजगी संस्थेकडे!!

ऐरोमोल वार्षिक 6 कोटी भाड्याने खाजगी संस्थेकडे

पुणे: (प्रतिनिधी कडून)– पुणे विमानतळ हे नेहमीच लाखो प्रवाशांनी गजबजून गेलेले असते. मात्र या प्रवाश्यांची सुरक्षितता आता केवळ रामभरोसेच उरलीय. याचे कारण विमानतळ प्रवेशासाठी जेंव्हा प्रवासी आपल्या कारने अथवा कॅबमधून ऐरोमोलमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस ऐरोमोलमध्ये खाजगी सुरक्षारक्षक प्रवेशप्रक्रिया पूर्ण करून प्रवाश्यांना प्रवेश पास देतात. ऐरोमोलमधून थेट विमानतळ लौंजपर्यंत हवाई बंदिस्त पूल बांधण्यात आला आहे, त्यातून प्रवाश्यांना इलेक्ट्रिक गाडीमधून नेण्यात येते.

गेल्या काही वर्षात देशातील विमानतळावरील दहशतवादी हल्ले, विमान हायजॅक करणे, अमली पदार्थ, दुर्मिळ धातू स्मगलिंग व इतर विमानतळ संबंधित गुन्ह्यात वाढ झालेली आपण रोज ऐकतो आहोत. काही महिन्यांपूर्वी अहमदाबाद येथील मोठी दुर्घटना असो, वा विविध ठिकाणी विमान हायजॅक प्रकरणे असोत, विमानतळ सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील बाब बनलेली असताना, पुणे विमानतळावर प्रवेश देण्यासाठी खाजगीकरण झालेल्या ऐरोमोलमध्ये खाजगी सुरक्षारक्षक कसे काय नेमले जाऊ शकतात?

मुळातच हवाई सुरक्षा दृष्टीने विमानतळ समोरील ऐरोमोल खाजगी संस्थेस भाड्याने देणे हे दहशतवादी वा गुन्हेगारांना थेट प्रवेश देण्यासाठी सरकारी घोडचूक आहे. ऐरोमोल हा एका खाजगी संस्थेस वार्षिक 6 कोटी रुपये भाड्याने देण्यात आला असून ऐरोमोलमध्ये कार पार्किंगकरिता 6 मजले आहेत, तर तळमजल्यावर ग्राहकांना खरेदीसाठी आंतरराष्ट्रीय ब्रँड्स औटलेट्स आहेत.

याबाबत पुणे विमानतळ व्यवस्थापक संतोष ढोके यांनी महामीडियावॉचशी बोलताना सांगितले की पुणे विमानतळचा कारभार व प्रवाशी संख्या वाढलेली असल्याने मनुष्यबळ कमी पडत आहे, ऐरोमोलमध्ये केवळ कार पार्किंग होते, तिथून प्रवेश देताना सर्व कार कॅब चालकांचे व फेस रेकॉर्डिंग होते, ओळखपत्रे चेक होतात. मात्र ही प्रवेशप्रक्रिया एका खाजगी संस्थेच्या हवाली कसे होऊ शकते? हा मोठा प्रश्न आहे, कारण ऐरोमोल मधून खाजगी सुरक्षा व्यवस्था भेदून वा आमिष दाखवून थेट विमानतळ वर प्रवेश करणारा कोणी अतिरेकी घेत विमानप्रवास करू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही.

खुद्द विमानतळ परिसरात रस्त्याने प्रवेश करणाऱ्यांना तासंतास रांगेत उभे राहून किचकट प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागते, मात्र ऐरोमोलमध्ये कार पार्किंग केल्यास खाजगी सुरक्षा रक्षक जुजबी चेकिंग करून फास्ट प्रवेश देतात, ही राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणणारी गोष्ट आहे.

पुणे विमानतळ परिसरात हवाई दलाच्या वेगळ्या धावपट्ट्या, विमाने व इतर महत्वाचे केंद्र आहेत, त्यांना धोका निर्माण झाला आहे.

SHARE

Chief Editor Hemant Mali

चालू घडामोडी, शोध बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.