महाराष्ट्र

अजून एक महाघोटाळा, नोंदणी उपमहानिरीक्षक माईनकर यांनी चुकीचे दस्त नोंदवून केलो शासनाची कोट्यवधीची फसवणूक

साताऱ्यात 452 दस्त चुकीचे नोंदवून सुमारे 800 कोटी महसूल बुडवला

पुणे: विशेष प्रतिनिधी –
*पुण्याचे नोंदणी उपनिरीक्षक मुद्रांक उपनियंत्रक धर्मदेव जे.माईनकर यांनी सन २०१३ ते २०१६ दरम्यान सातारा क्रमांक-२ येथील कार्यालयात दुय्यम निबंधक या पदावर कार्यरत असताना पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करून तसेच नोंदणी अधिनियम आणि नोंदणी कायद्यातील विविध कलमांचे सरसकट उल्लंघन करून एकूण ४५२ चुकीचे दस्त नोंदवून शासनाचा सुमारे ८०० कोटींचा महसूल बुडवल्याचे उघडकीस आले आहे*

याबाबत सविस्तर माहिती अशी की नोंदणी उपममहानिरीक्षक धर्मदेव माईनकर हे दिनांक ३/७/२०१३ ते दिनांक ३०/१/२०१६ या कालावधीत सातारा येथील दुय्यम निबंधक क्रमांक-२ या पदावर कार्यरत असताना त्यांनी भारतीय नोंदणी कायदा १९०८ मधील कलम ५५ (३) व महाराष्ट्रातील नोंदणी कायदा १९६१ मधील कलम १७,२९,३४,१७, व तुकडेबंदीचे कलम ४४ ई आदी कलमांचे सर्रास उल्लंघन करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला असल्याचे अॕड ज्ञानेश्वर कराळे यांनी महामिडिया वॉच न्यूजशी बोलताना सांगितले.

याबाबत अॕड कराळे यांनी ४५२ चुकीच्या दस्तनोंदणी विषयी सविस्तर अहवाल वजा तक्रार राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे व राज्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे दिनांक ९/१०/२०२५ व दिनांक ३/११/२०२५ अशी दोन वेळा केलेली आहे मात्र अद्यापही खात्यामार्फत व शासकीय यंत्रणेकडून माईनकर यांच्यावर कोणतीही कारवाई तर सोडाच साधी चौकशी देखील केली गेली नाही

पुण्यातील मौजे धायरी येथील सर्वे नंबर २५ मधील मिळकतीचा ४३६१/२०२५ या क्रमांकाचा दस्त माईनकर यांनी हवेली क्रमांक १३ येथे कार्यरत असताना दिनांक २०/६/२०१३ रोजी चुकीच्या पद्धतीने नोंदवून शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान केले होते याबाबत देखील अॕड ज्ञानेश्वर कराळे यांनी दिनांक २५/८/२०२५ रोजी नोंदणी महानिरीक्षक व प्रमुख मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे व अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे त्या तक्रारीवर कार्यवाही प्रलंबित असताना धर्मदेव
माईनकर यांना नोंदणी उप महानिरीक्षक या पदावर बढती केली गेल्याने नोंदणी व मुद्रांक विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत की काय अशी शंका उपस्थित होत आहे.

*अॕड कराळे यांनी माईनकर यांनी २०१३ ते २०१६ दरम्यान केलेल्या चुकीच्या दस्तनोंदणी मधील ४५२ दस्त सखोल अभ्यासले असून त्याचे दस्तक्रमांक,तारीख,गावाचे नाव, बुडवलेला एकूण महसूल, त्यातून शासनाचे झालेले नुकसान इत्यादी बाबतची सविस्तर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केलेली आहे*

तसेच नोंदणी उपमहानिरीक्षक धर्मदेव जे माईनकर यांची २०१३ पूर्वी व २०१६ नंतर ज्या ज्या ठिकाणी बदली झाली आहे त्या त्या ठिकाणी त्यांनी नोंदवलेल्या दस्तांची सखोल तपासणी व्हावी अशी मागणीही अॕड ज्ञानेश्वर  कराळे यांनी केली आहे.

SHARE

Chief Editor Hemant Mali

चालू घडामोडी, शोध बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.